प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १० December 06, 2017 प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - १० अंतरीच्या वृत्ती उफाळून आल्या सन १९४० च्या जुलैपासूनच खेड , जि.पुणे येथे श्री केदारेश्वराच्या मागील मठात निवास असतानाच आळे येथील श्री. वासुदेवानंद सरस्वती { पोटे } स्वामी महाराज यांच्याबद्दलची परस्परविरुद्ध अशी पुष्कळ माहिती श्रींना कळली होती. पैसे , दागदागिने वगैरे मागतात,घेतात, संग्रह करतात, इत्यादी सर्व विक्षिप्त वृत्तीची हकीकत कळली होती. पैसे घेणाऱ्या आणि संग्रह करणाऱ्या संन्याश्याचे मुखावलोकन करू नये, असे पूर्वाश्रमात श्रींना वाटत असे. हे सर्व माहित असून दिवसेंदिवस अंतरातून श्रींना अशी स्फूर्ती होऊ लागली कि, ते श्रोत्रिय ब्रम्हविद् वरिष्ठ आहेत व पूर्ण समाधान होण्यास त्यांच्या चरणावर शिष्यभावाने डोके ठेवणे जरूर आहे. ही अंतरीची वृत्ती , स्फूर्ती { Inner Voice } बळावत गेली. व १८-१-१९४३ ला खेड येथे चतुर्थाश्रम स्वीकारल्यानंतर दंड ग्रहण करण्यासाठी श्रींनी श्री. वासुदेवानंद सरस्वती { पोटे स्वामी } यांचेकडे जाण...