१२ ऑगस्ट १३४७:- दक्षिण भारतात बहामनी साम्राज्याची स्थापना १२ ऑगस्ट १३४७:- बहमनी साम्राज्याची स्थापना. हसन गंगू बहमनशाह पहिला सुलतान झाला. हिंदुस्तानातील पहिली शिया-मुस्लिम राजवट म्हणजे बहमनशाही. महंमद तुघलकचा सेनापती झाफर खान हा तुघलकांना न जुमानता पुर्वीच स्वतंत्र झाला होता. या जाफर खानाची हकीकत मोठी मजेची आहे. दिल्लीला एक विद्वान पंडीत होता. त्याचे नाव होते गंगाधरशास्त्री वाबळे. नावावरून हा मराठी असावा असे वाटते. हा बराच श्रीमंत होता व त्याने दिल्लीच्या आसपास शेतीवाडी खरेदी करून आपले व्यवस्थीत बस्तान बसवले होते. याच्याकडे एक गरीब पण अत्यंत अफगाणी हुशार मुलगा कामाला होता त्याचे नाव हसन. याच्यावर सगळे ब्राह्मणी संस्कारच झाले होते. एक दिवस या मुलाला शेतात काम करताना काही सोने भरलेले हंडे सापडले ते त्याने प्रामाणिकपणे मालकाला परत केले. त्याची हुशारी व प्रामाणिकपणा बघून बघून वाबळे शास्त्र्यांनी त्याच्या इतर शिक्षणाची सोय केली व तो एक दिवस तुघलकांच्या सेनेचा दक्षिणेत सेनापती झाला. इ.स. १३४६ च्या अनागोंदीमध्ये दिल्लीच्या सरदारांनी दख्खन प्रांताची लूट आणि नासधूस केली. ह्या घटनेनंतर दख्खनच्या...
बहमनी सत्तेचा उदय Post published: 21/02/2019 Post author: जयकुमार पाठक Post category: मध्ययुगीन इतिहास Post comments: 1 Comment मध्ययुगात दक्षिण भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. दिल्लीच्या खल्जी घराण्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील काही सुभे मुस्लिम सरदार-उमराव यांच्या ताब्यात होते. खल्जींच्या अवनतीनंतर (१३२०) उत्तर भारतात दिल्लीचे तख्त तुघलक घराण्याच्या ताब्यात होते. घियासुद्दिन हा तुघलक घराण्याचा संस्थापक. त्याच्यानंतर मुहम्मद बिन तुघलक (कार. १३२५–५१) हा दिल्लीचा सुलतान झाला. त्याच्या काळात राज्यविस्तार झाला. दिल्लीवरील परकीय आक्रमणांचा धोका टाळण्यासाठी व दक्षिणेत होणाऱ्या बंडांमुळे मुहम्मदास आपली राजधानी मध्यवर्ती अशा ठिकाणी असावी, असे वाटले. म्हणून त्याने इ. स. १३२७ मध्ये साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून देवगिरीची निवड केली. देवगिरीस दौलताबाद हे नाव देऊन सर्वांना तिकडे जाण्याचा हुकूम दिला आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. या स्थलांतराचे अनेक दूरगामी परिणाम दक्षिणेच्या राजकारणावर झाले. राजधानी देवगिरी उर्फ दौलताबादला हलविली, तरी मुहम्मदाला वारंवार उत्तरेत जाणे भाग पडत ...
कल्याण स्वामी कल्याण स्वामी (मराठी लेखनभेद: कल्याणस्वामी )), पूर्ण नाव : अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी; जन्म : बाभुळगांव येथे ( शा.श. १५५८ ), अर्थात इ.स. १६३६... समाधी इ.स.1714; डोमगाव, उस्मानाबाद जिल्हा , महाराष्ट्र ). हे स्वतः योगी व समर्थ रामदासांचे शिष्य होते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. [ संदर्भ हवा ] . कल्याण स्वामींचे समकालीन व्यक्तीने काढलेले चित्र बालपण व प्रारंभिक जीवन संपादन करा पाराजीपंतानी आपली बहीण व तिच्या मुलांसह समर्थांचा अनुग्रह घेतला. मूळच्या नाशिक परिसरातील कृष्णाजीपंत कुलकर्णी हे पहिल्या पत्नीच्या निधनानंतर तीर्थयात्रेसाठी कोल्हापूरला आले होते. तेथे पाराजीपंत (बरवाजीपंत) कुलकर्णी यांच्या रखुमाबाई नावाच्या बहिणीशी कृष्णाजीपंतांचा विवाह झाला. त्यांना ३ मुले झाली. पहिला म्हणजे, अंबाजी (जन्म शा.श. १५५८ म्हणजे इ.स. १६३६ ) व दुसरा दत्तात्रेय. या दोघांना एक बहीणही होती. रामदासस्वामी कीर्तनासाठी कोल्ह...
Comments
Post a Comment