प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र
- Get link
- X
- Other Apps
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २४
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २४
🌹 शाळिग्राम हृदयावर सरकवून घेतला 🌹
नंतरचे दाेन दिवस बाेलणे फारसे नव्हते. स्नान वगैरे सुरूच हाेते, पण समाधी अवस्था असावी. नंतर १० व्या दिवशीही बोलणे बंद हाेते. सकाळ व संध्याकाळचे स्नान स्नानगृहात न हाेता तेथेच परातीत बसवून घातले गेले. सकाळपासून घाेंगडीवर ठेवण्यात आले हाेते. बाेलणे बंद असले तरी फारच वेदना वाढल्यास 'श्रीराम, श्रीराम' असा उद्घाेष ते करीत असत. असाच सर्व दिवस गेला. रात्री एकच्या सुमारास डाॅ. कुलकर्णी ( त्यांच्या सेवेला रात्रभर हाेतेच. ) यांनी वेळ जवळ आल्याचे जाणले व पूर्वी श्रींनी सांगितल्याप्रमाणे शाळिग्राम त्यांच्या छातीवर ठेवला. वास्तविक श्रींचे हातपाय अगदी गार पडले हाेते. तशा अवस्थेतही श्रींनी आपल्या दाेन हातांनी ताे हृदयावर सरकवून घेतला. पूर्वी सांगितल्याप्रमाणेच त्यांना ( गंगाजळ व तुळशीपत्र ) तीर्थ घातले गेले. यानंतर भजनाचा घाेष सुरू असतांनाच ( फाल्गुन वद्य दशमीला रात्री १ वा. १० मिनिटांनी ) खाडकन् डोळे उघडले गेले. ( एकदम वीज चमकल्यासारखे झाले ) आणि त्याचवेळी प्राण पंचतत्वांत विलीन झाले. अशा रीतीने श्रींनी सांगितल्याप्रमाणे सर्व गाेष्टी घडल्या. नेत्रांतून प्राण जाणाऱ्या माणसास वैकुंठ प्राप्त हाेताे असे शास्त्र आहे असे सांगत व आम्ही तसेच जाणार असेही म्हणत. तसेच झाले. ह्या काळात उस्मानाबादची खूप मंडळी आली हाेती. इतरही गावाेगावची मंडळी दर्शनास येत हाेती. ४।५ गावची भजनी मंडळी, लेझीमवाले, मृदंगवाले, टाळकरी, माळकरी सर्व जमले हाेते. हरिजन, मुसलमान, सर्व तर्हेची अठरा पगड जात दर्शनास येत हाेती.
🌹 ती अपूर्व रथयात्रा 🌹
सकाळी श्रींना स्नान घालून दर्शनाकरिता देह ठेवला हाेता. हजाराेंनी दर्शन घेतले व दुपारी ११ च्या सुमारास गाडीचा रथ तयार करून साेवळ्यांत फुले, हार, पूजा करून श्रींचा ( स्वामींचा ) देह त्यात बसवला. हातात कमंडलू व दंड दिला. रूद्राक्षाची माळ गळ्यात घातली आणि भजनी मंडळांतील लाेक भजन करीत करीत सडे, रांगोळ्या घातलेल्या रस्त्यावरून थाटाने मिरवणूक श्री हंसराजांचे मठाकडे निघाली. ( परंडा, जि. उस्मानाबाद येथे श्री समर्थ शिष्य कल्याणस्वामी, नाथपंथीय कवी श्रीनाथभुजंग, सुप्रसिद्ध वेदान्ती संतकवी श्री हंसराज स्वामी, समर्थभक्त प. पू. श्री अनंतदास रामदासी इत्यादि महान संतांचे समाधिस्थाने असल्याने त्याला संतभूमीचा गाैरव प्राप्त झाला आहे. अनेक संतांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीतच स्वामी रमले नि चैतन्यरूप झाले. )
उन्हाळा, मार्चचे दिवस, त्यातच ११ ची दुपारची वेळ, तरी ५० ब्राम्हण साेवळ्याने अनवाणी रथ आेढण्यास तयार झाले. जवळ जवळ दहा हजार लाेक मिरवणुकीत हाेते. अशी ही अपूर्व मिरवणूक दुपारी ४ च्या सुमारास श्रीहंसराज स्वामींच्या मठात आली. श्रींना परत स्नान घालून साेवळ्याची वस्त्रे, कटिसूत्र, काैपीन, जी त्यांनी स्वतः धुवून साेवळ्यात ठेवून सूचना देऊन, लिहून ठेवली हाेती की शेवटच्या वेळी विशिष्ट ठिकाणी वस्त्रे ठेवली आहेत ती वापरावी, त्याप्रमाणे तीच वस्त्रे त्यांना नेसवून, पूजा करून, आरती करून सर्वांनी अश्रुपूर्ण नेत्रांनी शेवटचा निरोप दिला. बरीच जनता ढसढसा रडली. सर्वांनाच खूप वाईट वाटले. पण श्रींनी सांगून ठेवले हाेते की, 'देहरूपाने गेलाे तरी चैतन्यरूपाने मी तुमच्याजवळ आहे. तुम्ही कळवळून प्रार्थना करा. मी तुम्हाजवळच आहे.' असे सांगितले हाेते, त्याप्रमाणे सर्वांना अनुभव नेहमी येताे.
कुणी काय करावयाचे हे श्रींनी आधीच सर्व सांगून ठेवले हाेते. त्याप्रमाणे श्री विद्वत् यांना श्रींचे मस्तकावर श्रीफळ फाेडावयाचे काम सांगितले हाेते. त्यांनी 'दुसरे काही काम सांगा,' अशी प्रार्थना केली. पण 'तुला मूलबाळ नाही, आणि शास्त्रात असे सांगितले आहे की, समाधिस्थ हाेणार्या संन्याशाच्या मस्तकावर निःसंतान माणसाने नारळ फाेडल्यास त्यास संतान हाेते. त्याप्रमाणे तू शास्त्रप्रचीती घे. घाबरू नकाे. स्वामींची परवानगी आहे. तेव्हा तूच हे काम कर.' असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी श्रींची आज्ञा पाळली आणि श्रींना समाधिस्थ हाेऊन एक वर्ष हाेण्याच्या आत, विवाहानंतर १२ वर्षांनी, त्यांना कन्यारत्न झाले. या मुलीचे नाव त्यांनी प्रेमादरपूर्वक 'प्रज्ञा' असे ठेवले आहे.
त्याचप्रमाणे समाधिस्थळी एकात एक असे दाेन खड्डे काढावे लागतात. ते विशिष्ट मापाचे लागतात. त्या मापाच्या कळकाच्या काठ्या श्रींनी स्वतः तासून ठेवल्या हाेत्या. त्यावेळी काेणी विचारले 'हे काय करता?' तर सांगितले 'त्यावेळी शंभू ( आदिनाथराव यादव ) कदाचित् गडबडून जाईल व हे तुकडे तासताना हातबित कापून घेईल म्हणून आम्हीच आधी तासून ठेवताे.' ह्या शिष्यवात्सल्याची तुलना कशाबराेबर करावी बरे! धन्य ताे शंभू व धन्य ती गुरूमाऊली!
लेखिका : श्रीमती कमलताई बा.वैद्य
छायाचित्र संकलन : वे. मू. श्री. अनुप बाळकृष्ण जोशी गुरूजी, परंडा, जि. धाराशिव
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
।। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ।।
।। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ।।
Popular posts from this blog
प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १
।। श्रीरामसमर्थ ।। ।। जय जय रघुवीर समर्थ।। ।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
सद्गुरूचरित असे हो अनंत । ठाऊक समस्त कोणा होय। ।वर्णाया नवचे चरित्र हो याचे । ओढे हे मनाचे प्रेमास्तव।। ( श्रीसमर्थपाठ - श्री श्रीधरस्वामी कृत )
नमस्कार सज्जनहो….. आजपासून आपण प.पू श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्राचा रोज थोडा थोडा भाग पाहूया.
प.पू.प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांचे चरित्र त्यांच्या अंतरंग शिष्या व स्वामींच्या उत्तराधिकारी प.पू. डाॅ.श्रीमती कमलताई बाळकृष्ण वैद्य यांनी लिहिलेले हे गोष्टी स्वरुपात उपलब्ध आहे.तेच चरित्र आपण पाहू. प.पू.कमलताई यांनी स्वामी हयात असताना,स्वामी समक्ष साधना केलेल्या साधक आहेत. स्वामींचा त्यांना तीस ते पस्तीस वर्षे सहवास लाभला आहे. या चरित्रामध्ये स्वामींचा कुलपरिचय, स्वामींचा जन्म, बालपण, तरूणपणातील तपश्चर्या, स्वामींना अनुग्रह, बाबा गंगादासांचा सहवास ,रामायणाची गोडी, प.पू वासुदेवानंद सरस्वती स्वामीं कडून संन्यास दीक्षा, यांचे चमत्कार , त्यांचे शिष्य, परंडा रहिवास व शेवटी प्रयाणकाळ अशा विविध अंगानी स्वामींचे चरित्र आपण पाहणार आहोत. आज परंड…

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १०
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - १०
अंतरीच्या वृत्ती उफाळून आल्या
सन १९४० च्या जुलैपासूनच खेड , जि.पुणे येथे श्री केदारेश्वराच्या मागील मठात निवास असतानाच आळे येथील श्री. वासुदेवानंद सरस्वती { पोटे } स्वामी महाराज यांच्याबद्दलची परस्परविरुद्ध अशी पुष्कळ माहिती श्रींना कळली होती. पैसे , दागदागिने वगैरे मागतात,घेतात, संग्रह करतात, इत्यादी सर्व विक्षिप्त वृत्तीची हकीकत कळली होती. पैसे घेणाऱ्या आणि संग्रह करणाऱ्या संन्याश्याचे मुखावलोकन करू नये, असे पूर्वाश्रमात श्रींना वाटत असे. हे सर्व माहित असून दिवसेंदिवस अंतरातून श्रींना अशी स्फूर्ती होऊ लागली कि, ते श्रोत्रिय ब्रम्हविद् वरिष्ठ आहेत व पूर्ण समाधान होण्यास त्यांच्या चरणावर शिष्यभावाने डोके ठेवणे जरूर आहे. ही अंतरीची वृत्ती , स्फूर्ती { Inner Voice } बळावत गेली. व १८-१-१९४३ ला खेड येथे चतुर्थाश्रम स्वीकारल्यानंतर दंड ग्रहण करण्यासाठी श्रींनी श्री. वासुदेवानंद सरस्वती { पोटे स्वामी } यांचेकडे जाण्याचे ठरविले. श्री. प.पू.आळ्याच्या महाराजांशी परिचय असलेला माणूस श्रींच्या बरोबर होता. त्याने मोटारचे तिकी…

Comments