बहमनी सत्ता
बहमनी सत्ता बहमनी सत्ता (इ. स. १३४७-१५३८). मध्ययुगात द. भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. चौदाव्या शतकात द. भारतावर दिल्लीच्या मुहंमद तुघलकाचा अमंल होता. त्याच्या विरूद्ध इ. स. १३२७ पासून बंडाळीला सुरूवात झाली होती. ती शमविण्यासाठी मुहंमद तुघलक याने दक्षिणेतील अमीरांना विश्र्वासघाताने ठार मारण्याचा कट रचला; पण तो उघडकीस येऊन सुलतानाने पाठविलेल्या दूतासच ठार मारण्यात आले (इ. स. १३४५) आणि अमीरांनी आपला पुढारी अमीर जफरखान ऊर्फ ⇨हसन गंगू (कार. १३४७-५८) याला दोलताबाद येथे राज्याभिषेक केला (१३४७). त्याने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण करून ३ ऑगस्ट १३४७ रोजी बहमानी राज्याची स्थापना केली. त्याच्या मूळ घराण्यविषयी तसेच नावाबद्दल इतिहासकारांत एकमत नाही. बुर्हान-इ-मआसिर व तबकात-इ- अकबरी या ग्रथांनुसार इस्फंदयारचा मुलगा बहमन त्याचा हसन गंगू हा मुलगा. हे दोन्ही ग्रंथ फिरिश्ता (१५५० - १६२३ ?) पूर्वी लिहिले गेले; तरी फिरिश्ताच्या मते बहमन हा इराणचा प्राचीन राजा असून त्याच्या वंशातील हसन गंगू होता. काहींच्या मते हसन गंगूचा मालक ब्राह्मण होता, म्हणून त्याने बहमन हे नाव धारण केले असावे...
Comments
Post a Comment