हंसराज, स्वामी हंसराज, स्वामी वेदान्तवेत्ते, धर्मचिंतक, ग्रंथकार जन्मदिनांक : १८०५ मृत्युदिनांक : १८५५ कार्यक्षेत्र : धर्मपरंपरा जन्मस्थळ : परभणी य वनांची राजवट असलेल्या तत्कालीन परभणी नगरात वडील गंगाधरपंत आणि आई रेणुकाबाई यांच्या पोटी श्री हंसराज स्वामी यांचा जन्म झाला. आश्वलायन शाखेचे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण घराणे; परंतु त्यांची परिस्थिती फारच ओढगस्तीची होती. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना जगण्यासाठी गावोगावी फिरावे लागले. हंसराज स्वामींचे मूळ नाव नारायण. नारायणाचे शिक्षण होत नाही म्हणून आई-वडिलांचा जीव तीळतीळ तुटायचा. नारायण अतिशय देखणा व तेजस्वी होता. बुद्धिमान होता. आणि म्हणूनच रीतसर शिक्षण झाले नसले तरी आकलनशक्ती तेज असलेल्या एकपाठी नारायणाने धूळपाटीवर अक्षर-ओळख करून घेतली आणि त्यांनी ज्ञानेश्वरी, दासबोध, दीपरत्नाकर अशी विपुल ग्रंथसंपदा प्रथम वाचून काढली. या बोधामृतानेही त्यांचे समाधान होत नव्हते. आत्मज्ञान होणे महत्त्वाचे आहे असे त्यांना वाटे. गुरूंनी ‘तत्त्वमसि’ची ओळख द्यायला पाहिजे ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे ते अस्वस्थ असत. भौतिक सुखे त्यांना निरस व...
Comments
Post a Comment