श्रीहंसराजस्वामीकृत 'लघुवाक्यवृत्ति' - ग्रंथपरिचय
मुखपृष्ठ षड्दर्शने आपले वेद आपली उपनिषदे आपली पुराणे रामायण आपले संत श्रीब्रह्मचैतन्य स्तोत्राणि सूक्तानि संकीर्ण ग्रंथ शब्दशोध संपर्क श्लोक १ ला श्लोक २ रा श्लोक ३ रा श्लोक ४ था श्लोक ५ वा श्लोक ६ वा श्लोक ७ वा श्लोक ८ वा श्लोक ९ वा श्लोक १० वा श्लोक ११ वा श्लोक १२ वा श्लोक १३ वा श्लोक १४ वा श्लोक १४ वा श्लोक १४ वा श्लोक १४ वा श्लोक १४ वा श्रीहंसराजस्वामीकृत 'लघुवाक्यवृत्ति' - ग्रंथपरिचय परंड्याला असताना हंसराजस्वामींनी एका उत्कृष्ट ग्रंथाची रचना केली. तो म्हणजे लघुवाक्यवृत्ती होय, श्री शंकराचार्यांच्या लघुवाक्यवृत्ती नावाच्या एका प्रकरणावरील पदबोधिनी नावाची ही टीका आहे. ही टीका काशीनाथबाबा दीक्षित यांच्यासाठी लिहिली गेली आहे, असे हंसपद्धती सांगते. डॉ. वि. रा. करंदीकरांनी 'आपले पट्टशिष्य रघुनाथशास्त्री गोडबोले यांच्यासाठी हा ग्रंथ स्वामींनी लिहिला' असे म्हटले आहे (मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड ४ था, २ री आ. पृ. ६०८) पण ते बरोबर नाही. स्वामींच्या एकूण ग्रंथांमध्ये याच ग्रंथाला सर्व...