बहामनी साम्राज्याची स्थापना
१२ ऑगस्ट १३४७:- दक्षिण भारतात बहामनी साम्राज्याची स्थापना १२ ऑगस्ट १३४७:- बहमनी साम्राज्याची स्थापना. हसन गंगू बहमनशाह पहिला सुलतान झाला. हिंदुस्तानातील पहिली शिया-मुस्लिम राजवट म्हणजे बहमनशाही. महंमद तुघलकचा सेनापती झाफर खान हा तुघलकांना न जुमानता पुर्वीच स्वतंत्र झाला होता. या जाफर खानाची हकीकत मोठी मजेची आहे. दिल्लीला एक विद्वान पंडीत होता. त्याचे नाव होते गंगाधरशास्त्री वाबळे. नावावरून हा मराठी असावा असे वाटते. हा बराच श्रीमंत होता व त्याने दिल्लीच्या आसपास शेतीवाडी खरेदी करून आपले व्यवस्थीत बस्तान बसवले होते. याच्याकडे एक गरीब पण अत्यंत अफगाणी हुशार मुलगा कामाला होता त्याचे नाव हसन. याच्यावर सगळे ब्राह्मणी संस्कारच झाले होते. एक दिवस या मुलाला शेतात काम करताना काही सोने भरलेले हंडे सापडले ते त्याने प्रामाणिकपणे मालकाला परत केले. त्याची हुशारी व प्रामाणिकपणा बघून बघून वाबळे शास्त्र्यांनी त्याच्या इतर शिक्षणाची सोय केली व तो एक दिवस तुघलकांच्या सेनेचा दक्षिणेत सेनापती झाला. इ.स. १३४६ च्या अनागोंदीमध्ये दिल्लीच्या सरदारांनी दख्खन प्रांताची लूट आणि नासधूस केली. ह्या घटनेनंतर दख्खनच्या...